दिनांक 19 फेब्रुवारी डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय, तळसंदे मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक, पोवाडा गीत गायन व महाराजांच्या विषयी विविध विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डी. एन. शेलार तसेच प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला