RAWE Krushi Melava

तांदुळवाडी येथे भव्य कृषी मेळावा संपन्न
तांदुळवाडी ता. वाळवा येथे डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय, तळसंदे तर्फे ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी कृषी मेळावा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते मा. श्री. आबासाहेब साळुंखे सर व मा. श्री. प्रकाश कदम सर यानी अनुक्रमे ऊस उत्पादन तंत्रज्ञान व भाजीपाला व्यवस्थापन तंत्रज्ञान याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा. डी. एन. शेलार सर (प्राचार्य कृषी महाविद्यालय, तळसंदे) यांनी भूषविले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.ए .बी. देशपांडे सर ( सहाय्यक प्राध्यापक राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविदयालय कोल्हापूर) आणि तांदुळवाडी गावच्या सरपंच श्रीमती. अल्का काळे व उपसरपंच मा.शाशिकांतदादा पाटील हे लाभले.या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यानी शेतकर्यासाठी उपयुक्त असा QR CODE तयार केला आहे त्यामधे शेतकरयांना लागणारी विविध पुस्तके आणि कृषी दैनंदिनी त्यामधे त्यांना उपब्धत करून दिलेत.याची माहिती कृषीदूत ऋतिक काळोखे याने दिले.कृषी मेळाव्यामध्ये तांदुळवाडी व परिसरातील किनी, बहादुरवाडी , कोरेगाव , भडकंबे आणि शिगांव या विविध गावातील असंख्य शेतकऱ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.कृषी महावद्यालय तळसंदेचे अकॅडमिक इन्चार्ज प्रा.आर .आर.पाटील सर, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. एम. घोलपे व रावे कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. के.मयेकर मॅम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कृषिकन्या सायली पेडणेकर,सोनाली शिंदे आणि ऐश्वर्या पोतदार आणि आभार प्रदर्शन कृषिकन्या गिरिजा जोशी हीने केले.