NSS Camp 2022-23 [12 जानेवारी 2023]

दिनांक १२ जानेवारी २०२३ पासून राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर तांदुळवाडी येथे सुरू झाले… शिबिराची सुरवात स्वागत समारंभाने पार पडला.माननीय अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डी. एन. शेलार सर यांनी कार्यक्रमास उपस्थिती दर्शवून सर्व स्वयंसेवकांचा उत्साह वाढवला तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. के. मयेकर यांनी शिबिर कालावधीमध्ये ग्रामस्थांचे सहकार्य मिळावे असे आवाहन देखील केले. ग्रामस्थांनी देखील उत्साहात सर्व स्वयंसेवकांचे गावात स्वागत केले.