२६ नोव्हेंबर २०२२ , डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय तळसंदे येथे भारतीय संविधान दिन राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी अगदी उत्साहाने साजरा केला. यामध्ये सर्व प्रथम भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर आपल्याला संविधानाने दिलेल्या अधिकारा बाबतीत जनजागृती करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्याना आपले मौलिक अधिकार समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जसा आजचा दिवस आपण एक सुवर्ण क्षण म्हणुन साजरा करतो त्याच प्रमाणे २६/११ हया दिवशी झालेल्या अतिरेकी हल्ल्यामध्ये आपल्या बऱ्याच वीरांना अमरत्व प्राप्त झाले होते. त्या सर्व वीरांना एक वंदन म्हणून दोन मिनिटे मौन पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे एज्युकेशन इन्चार्ज प्रा. आर. आर. पाटील, कृषी तंत्रनिकेतन चे प्राचार्य प्रा. पी. एस. पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. के. मयेकर, डॉ. एन. आर. कडगे तसेच कर्मचारी वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते