Blood Donation Camp on17th December 2022

डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय येथील रक्तदान शिबिरात ८२ बाटल्या संकलित….
डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल ज्ञान शांती रक्त पेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . शिबीराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डी. एन. शेलार यांच्या हस्ते झाले. तसेच त्यांनी आजच्या जीवनात रक्तदानाचे महत्त्व किती आहे व सर्व विद्यार्थ्यानी रक्तदान करावे असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. या शिबिरात विदयार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.पुर्ण शिबिरामध्ये विक्रमी ८२ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
रक्तदान शिबीराचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. के. मयेकर यांनी केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय. डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी. डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज संजय पाटील, विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता,महाविद्यालयाचे प्राचार्य डी. एन. शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.