दिनांक १३ जुन २०२२ रोजी डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय, तळसंदे येथे पर्यावरण जनजागृती व स्वच्छ्ता सप्ताहाची सांगता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठाचे पर्यावरण विज्ञान विषयाचे प्राध्यापक, गाढे अभ्यासक माननीय उदयसिंग गायकवाड उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डी.एन.शेलार,अकॅडमीक इन्चार्ज प्रा. आर. आर. पाटील, विस्तार शिक्षण विभागाचे प्राध्यापक डॉ. एस. एम. घोलपे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.के. मयेकर व सर्व शिक्षक- शिक्षकेत्तर वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम अधिकारी प्रा. मयेकर यांनी गेल्या पुर्ण सप्ताहा मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी राबविलेल्या कार्यक्रमांची माहिती सर्वांना दिली तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन लाभलेले प्रा. गायकवाड सरांची ओळख व पर्यावरण विषयक त्यांनी केलेल्या कार्याची विद्यार्थ्याना माहिती करून दिली. प्रमुख पाहुण्यांनी कचऱ्याचे अर्थकारण आणि त्यामागचे विज्ञान विद्यार्थ्याना समजावून सांगितले.तसेच यापुढे अन्न वाया घालवणार नाही, कागद वाया घालवणार नाही आणि माझ्या घरातील कचऱ्याचे व्यवस्थापन मी स्वतः करेन अशी तीन वचने विद्यार्थ्यांकडून घेतली. महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी आणि सर्व स्वयंसेवकांचे कौतुक करुन पुढील कामासाठी प्रोत्साहित केले. सरते शेवटी सर्व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी पुर्ण कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आणि यापुढे देखील पर्यावरण रक्षणासाठी कायम कार्यरत राहण्याचे आश्वासन दिले.