डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय, तळसंदे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेे अंतर्गत दिनांक ०७ जुन २०२२ ते १३ जुन २०२२ हा सप्ताह या कॅम्पेन अंतर्गत पर्यावरण जनजागृती आणि स्वच्छता सप्ताह म्हणुन साजरा होत आहे. त्याचाच भाग म्हणुन आज महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी वाठार या गावात जावून रॅली, घोषणा तसेच पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती केली.