क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती – 03 January 2023

डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय, तळसंदे येथे दिनांक ३ जानेवारी २०२३ रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डी. एन. शेलार यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक कु. कोमल आदाते हिने आजचा दिवस आपण बालिका दिन म्हणून देखील साजरा करणार आहोत तसेच सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज महिला वेगवेगळया क्षेत्रात अग्रेसर आहेत असे आपल्या मनोगतात व्यक्त केले.