ई पीक पाहणी ॲप प्रशिक्षण 30 June 2022

ई पीक पाहणी हे ॲप महसूल विभाग महाराष्ट्र राज्य यांनी विकसित केले आहे या ॲपमुळे शेतामध्ये असलेला पेरा नोंद करण्याची सुविधा करण्यात आलेली आहे या संदर्भात महसूल विभाग महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र कृषी संशोधन परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने  ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. या प्रशिक्षणामध्ये डॉ डी वाय पाटील कृषी महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी, ग्रामीण कृषि जागरूकता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत येणारे सर्व कृषिदुत, कृषिकन्या तसेच सर्व प्राध्यापकांनी उत्स्फूर्त पणे सहभाग नोंदविला.