दिनांक २१ जुन २०२२ रोजी सकाळी ७ वाजता डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय, तळसंदे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये सर्वप्रथम राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. श्वेता मयेकर यांनी योगदिनाचा इतिहास तसेच योगदिनाचे महत्त्व विद्यार्थ्याना समजावून सांगितले. त्यानंतर क्रिडा शिक्षक बंद्रे सरांनी विविध योगासनांचे प्रकार विद्यार्थ्याना दाखविले व त्यांच्या कडून करवून घेतले. महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डी.एन.शेलार यांनी योगासन ही आपली एक जीवनशैली आहे आणि ती प्रत्येकाने आचरणात आणावी असे आवाहन विद्यार्थ्याना केले.विद्यार्थ्यानी देखील अतिशय उत्साहात सहभाग नोंदवला.