राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत सर्व स्वयंसेवकांचा अभ्यास दौरा , तळसंदे ,५ नोव्हेंबर २०२२

दिनांक ५ नोव्हेंबर २०२२ रोजी डॉ.डी.वाय.पाटील कृषी महाविद्यालय, तळसंदे येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत सर्व स्वयंसेवकांचा अभ्यास दौरा काढण्यात आला होता. यामध्ये सर्व प्रथम प्रियांका फुड्स अँड नॅचरल या इंडस्ट्री ला भेट देण्यात आली.या मध्ये मशरूम शेती तसेच शैवाळ शेती याबद्दल विद्यार्थ्याना मार्गदर्शन करण्यात आले. त्यांनतर जाखले गावामध्ये श्रमदानातून केलेल्या जल संवर्धनाची कामे विद्यार्थ्याना दाखविण्यात आली. विद्यार्थ्यांनी देखील त्या सर्व कामातून प्रेरणा घेवून यापुढील जल संवर्धनाच्या कामासाठी आम्ही श्रमदान करू अशी ग्वाही सरपंचांना दिली. या संपूर्ण अभ्यास दौऱ्यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डी. एन. शेलार  तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा.एस. के. मयेकर , प्रा. वाय. व्ही. पाटील  उपस्थित होते.